मद्यपान करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील मांडवी येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्रशान करणाऱ्या दोघा तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमर बंदेनवाज शेख (वय २०) व महमद रफिक हुसेन शेख (३२) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना शुक्रवारी (ता. ११) रात्री साडेआठच्या सुमारास मांडवी येथील वाळूवर निदर्शनास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हे मांडवी येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत असताना आढळले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल आशिष भालेकर व पोलिस कॉन्स्टेबल कौस्तुभ जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.