
देव, घैसास, कीर महाविद्यालयात शिवसोहळा कार्यक्रम उत्साहात
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर, वरिष्ठ महाविद्यालयामध्ये शिवजयंतीनिमित्त आजीवन अध्ययन व विस्तार विभागाअंतर्गत तीन दिवसीय शिवसोहळा कार्यक्रमाचा साजरा करण्यात आला.*
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचावेत, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने शिवसोहळा कार्यक्रम आयोजित केला. यात कथाकथन, प्रश्नमंजुषा व व्हिडीओ मेकिंग स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कथाकथन स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. वैभव कीर, प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी इतिहास विभागप्रमुख प्रा. मंदार बेटकर व व्हिडिओ मेकिंगसाठी उपप्रचार्या प्रा. वसुंधरा जाधव परीक्षण केले.
या स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. कथाकथन स्पर्धेत गौरवी ओळकर (प्रथम), दर्शन शिंदे व पलक वाघेला (द्वितीय) व सानिका खर्डे हिने (तृतीय) क्रमांक पटकविला. प्रश्नमंजुषा स्पर्धेत समृद्धी बोरकर (प्रथम), गौरवी ओळकर व डॉली आलीम (द्वितीय) व नेहा गोसावी व सानिका खर्डे (तृतीय) क्रमांक मिळविला. व्हिडिओ मेकिंगमध्ये रावसाहेब होसूर व संजोग भातडे (प्रथम), सोनिया शुक्ला (द्वितीय) व पारस गुळेकर (तृतीय) क्रमांक मिळविला.
या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य मधुरा पाटील उपस्थित होत्या. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला उपप्राचार्या वसुंधरा जाधव, वाणिज्य शाखा प्रमुख प्रा. राखी साळगावकर, आजीवन अध्ययन व विस्तार विभागप्रमुख प्रा. आसावरी मयेकर उपस्थित होत्या. अनुष्का नागवेकर हिने आभार मानले.