
अपघातामधील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
राजापूर : तालुक्यातील दोनिवडे येथील तीव्र उतारावर दुचाकीच्या झालेल्या अपघातामधील जखमी युवक अरविंद अनंत गोरूले (२७) याचे रत्नागिरी येथे उपचारादरम्यान निधन झाले.
शेंबवणे ओझरवाडी येथील अरविंद हे राजापूर नगर परिषदेच्या आरोग्य विभागात कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून काम करीत होते. नेहमीप्रमाणे ते आपल्या ड्यूटीवर निघाले होते. दोनिवडे येथील उतारावर आले असताना दुचाकी ऑईल व टाकण्यात आलेल्या मातीमुळे घसरल्याने अपघात झाला. यामध्ये त्यांच्या डोक्याला जोरदार मार बसला.