
भाजपा च्या पुढाकाराने कुवारबाववासीयांचे ११ मार्च पासून निर्णायक आंदोलन : सतेज नलावडे
रत्नागिरी : गेले कित्येक वर्षे कुवारबाववासीय, प्रशासनाकडे विनंती व विनवणी करत होते परंतु जिल्हाधिकारी यांनी नागरिकांच्या मागण्या लाल फीतीत अडकवून बोळवण केली यामुळे गावातील नागरिक संतप्त झाले असून. जिल्हाधिकारी याना पत्र देण्यात आले त्यामधील प्रमुख चार मागण्या.
१)कुवारबाव मधील २३ गृहनिर्माण संस्थांचे सुमारे ७५० भूखंड त्यांचे नावावर करण्यासाठी अकारफोड ची अंमल करणे.
२)कुरण ह्या चुकीच्या नावाखाली ३० झोपडी धारकांचा अडवलेला घरकुल प्रस्ताव त्वरित मंजूर करणे.
३)घनकचरा व FSTP साठी गावातील ८० गुंठे जमीन त्वरित ग्रामपंचायतीला हस्तांतरित करणे.
४)कारवांचीवाडी येथील रस्ता,अपघाती मृत्यू होऊनही न करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करणे.
भाजपा पदाधिकारी आंदोलन पत्र देण्याआधी माझ्याकडे आले असते तर मीच प्रश्न सोडवले असते-असे पूर्वी म्हणणाऱ्या पालक मंत्री महोदयांनी ना फोन उचलला ना स्वीयसहायकाकडे पाठवलेला निरोप ऐकला.
हे सर्व प्रश्न नागरिकांचे जिव्हाळ्याचे असल्याने व कित्येक वर्षे प्रलंबित ठेवल्याने नाईलाजाने सर्वांनी ११ मार्च पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला व याला दिरंगाई करणारे प्रशासनच जबाबदार आहे.
याबाबतचे पत्र भाजपा जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे,पत्रकार संस्थेतील मान्यवर श्री.अतिक पाटणकर,महीला तालुकाअध्यक्षा सौ.प्रियल जोशी,दीपक आपटे,प्रशांत जोशी,शामराव माने यांचे उपस्थितीत देण्यात आले.