
वांद्री येथील तरुणाची गळफासाने आत्महत्या
संगमेश्वर : तालुक्यातील वांद्री येथील २१ वर्षीय तरुणाने गळफासाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. प्रथमेश दत्ताराम सनगरे (२१, वांद्री, कुणबीवाडी, ता. संगमेश्वर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
प्रथमेश हा पुणे येथे शिकत होता. तो गावी आला होता. घरात कोणी नसल्याची संधी साधून त्याने घरातील दरवाजाला आतून कडी लावून आत्महत्या केली.
प्रथमेश याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. ही चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून या चिठ्ठीत त्याने पुणे शिक्षण घेत असताना नोकरी मिळत नसल्याचे आत्महत्या करत असल्याचे कारण लिहिलें आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.