
संघर्ष मित्र मंडळ फणसोप रत्नागिरी यांच्या वतीने माघी गणेशोत्सव २०२५ निमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
रत्नागिरी : संघर्ष मित्र मंडळ फणसोप रत्नागिरी हे माघी गणेशोत्सवाचे यंदाचे २५ वे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहेत. सन २००१ साली फणसोप गावातील मुलांनी एकत्र येऊन संघर्ष मित्र मंडळाची स्थापना करून माघी गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि आज या परंपरेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
यंदाचे २५ वे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करतांना मंडळाकडून अवयव दान, नेत्रदान, देहदान याबाबत जनाजगृती होणे या उद्देशाने शासकिय वैद्यकिय महविद्यालय रत्नागिरी चे समाजसेवा अधिक्षक श्री. रेशम जाधव यांना मंडळाने आमंत्रित केले होते. श्री. रेशम जाधव यांनी उपस्थित लोकांना अवयव दान, नेत्रदान,देहदान याची सविस्तर माहिती दिली व जनजागृती केली. सदर कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष श्री. सचिन साळवी,
संघर्ष मित्र मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व महिला मंडळ यांचे सहकार्य लाभले.