
अज्ञात कारणातून वृध्दाने फिनेल प्राशन प्राशन
रत्नागिरी:-
अज्ञात कारणातून फिनेल प्राशन केलेल्या वृध्दावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रविंद्र जयराम सुर्वे (68,रा.वक्रतुंड अपार्टमेंट साळवी स्टॉप,रत्नागिरी) असे फिनेल प्राशन केलेल्या वृध्दाचे नाव आहे. रविंद्र सुर्वे हे रविवार 19 जानेवारी रोजी दुपारी 3 वा. सुमारास दारुची बाटली समजून फिनेल प्राशन केले. काही वेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यावर त्यांच्या पत्नीने त्यांना जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे.