
चूल पेटवतना भाजलेली वृद्धा गंभीर
रत्नागिरी : चुल पेटवताना बाजुच्या रॉकेलच्या कॅनला धक्का बसून भडका उडाल्यामुळे भाजून गंभिर जखमी झालेल्या वृध्देवर कोल्हापूर येथे उपचार सुरु आहेत.
लक्ष्मीबाई जनार्दन झोरे (69,रा.खोपी कुपरेवाडी,खेड) असे भाजलेल्या वृध्देचे नाव आहे. रविवार 19 जानेवारी रोजी त्या घरी एकट्याच असताना त्यांनी चुल पेटवली होती. त्यावेळी चुलीच्या बाजुलाच असलेल्या रॉकेच्या कॅनला त्यांचा धक्का बसून रॉकेल चुलीतील विस्तवावर पडल्याने भडका उडाला. त्यामुळे त्यांच्या अंगावरील साडीने पेट घेतल्याने त्या 80 टक्क्े भाजल्या. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने कळंबणी खेड येथील रुग्णालयात नेउन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.