
महावितरण अधिकाऱ्याला शिवीगाळ, तक्रार दाखल
दापोली:
दापोली येथील महावितरणच्या अधिकाऱ्याला फोनद्वारे शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दापोली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेल्या माहितीनुसार महावितरणचे सहाय्यक अभियंता सिद्धारूढ श्रीकांत तेवरे यांनी करंजाणी येथील लक्ष्मण विठ्ठल नाटेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. नाटेकर यांची यांची करंजाणी येथे चिरेखाण असून तेथील त्यांनी १० महिन्याचे वीजबिल भरलेले नाही. नाटेकर यांनी तेवरे यांना आमचे
बिल एवढे जास्त कसे काय आले आहे असे फोनवरून विचारले. तेवरे यांनी नाटेकर यांना ते बिल सांगितले. मला बघायला लागेल असे नंतर तेवरे यांनी नाटेकर यांना तुमचे बिल बरोबर दिलेले आहे. आपण स्वतः ते बिल तपासल्याचे सांगितले. नाटेकर यांना राग आल्याने त्यांनी तक्रारदार तेवरे यांना फोनवरून शिवीगाळ करून धमकी दिल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याचा तपास पोलीस हेडकॉस्टेबल पवार करीत आहेत.