
बंड्या साळवींचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
रत्नागिरी:-
शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख म्हणनू सतरा वर्षे काम केले. आता दुसऱ्याला संधी मिळावी ही प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे कोणतेही कारण नसले तरी मी तालुकाप्रमुख पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हा प्रमुखांकडे दिला आहे. पण एक खरं आहे की, सत्तेशिवय पर्याय नाही. सत्तेच्या जवळ नाही गेलो तर ग्रामीण भागातील माझा कार्यकर्ता जवळ रहाणार नाही. ज्यानी विधानसभेला 70 हजार मतं दिली ती 17 हजार मते व्हायला वेळ लागणार नाही. आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहे. भविष्यात काही विचार केला तर बाळासाहेबांच्या विचाराच्या पक्षाचे काम करू, असे शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी स्पष्ट करीत शिवसेनेत (शिंदे गट) जाण्याचे थेट संकेत दिले.
बंड्या साळवी यांनी दोन दिवसांपूर्वीच जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्याकडे रत्नागिरी तालुकाप्रमुख पदाचा राजिनामा दिली. याबाबत त्यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी बंड्या साळवी म्हणाले, मी शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा देऊन पदाचा त्याग केला आहे. त्याचे कारण काही नाही. 2007 ते 2024 पासुन मी पक्षाचे काम करतोय. माझ्या कारकिर्दीत 3 निवडणुका झाल्या. उदय सामंत, खासदार विनायक राऊत निवडुन आले. जिल्हा परिषद, पंचायत समिती, रत्नागिरी पालिकेत सत्ता मिळवली. गेल्या सहा महिन्यांपूर्वीच मी राजीनाम्याबाबत माझ्या वरिष्ठांशी बोललो आहे. दुसऱ्या चांगल्या पदाधिकाऱ्याला संधी द्यावी, अशी विनंती मी त्यांना केली होती.
परंतु ऐन निवडणुकीच्या काळात राजीनामा दिला असता तर अऩेक शंका उपस्थित राहिल्या असत्या. म्हणून दोन्ही निवडणुकांना सामोरे गेला. परंतु आम्ही कुठेतरी कमी पडलो. विधानसभा निवडणुकतील अपयशानंतर ठरविले आता पदाचा त्याग करावा. त्यानुसार मी राजीनामा दिला. गेल्या 17 वर्षांमध्ये तालुक्यात शिवसेनेला मोठी गळती लागली. अडिच वर्षांपूर्वी शिवसेनेचे दोन तुकडे झाले. मी राज्याचा नाही, परंतु रत्नागिरीचा विचार केला फाटाफुट झाल्यामुळे एकनिष्ठ कार्यकर्ता होता तो बिथरला गेला. कार्यकर्त्ये पदाधिकाऱ्यांची विकास कामे असत. त्यांना आम्ही काम देऊ शकलो नाही, उभे करू शकलो नाही. उदय सामंत, उद्योगमंत्री, पालकमंत्री होते. त्यांनी कोट्यवधीची कामे केली. पदाधिकारी कार्यकर्त्यांना उभे केले. परंतु आम्ही विकासपासून वंचित राहिलो. त्याचा फटका आम्हाला विधानसभेला बसला. तीन महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक आहेत. माझ्या बरोबर राहिलेल्या प्रत्येकाला वाटते की जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा पालिकेचा सदस्य होण्याची इच्छा आहे. त्या आपण पुऱ्या करू शकत नाही. म्हणून सर्वांशी चर्चा केली आहे. दोन दिवसात पुन्हा चर्चा करून माझ्या कार्यकर्त्याचे कसे भले होईल, त्यांचा विचार करून योग्य तो निर्णय घेईन.