
विज्ञान प्रदर्शनातूनच संशोधक, शास्त्रज्ञ तयार व्हायला पाहिजेत
माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्ण सावंत यांचे प्रतिपादन
रत्नागिरी : रत्नागिरीने देशाला अनेक महान अशी रत्ने दिली आहेत त्यामुळे इतिहासामध्ये रत्नागिरीची ओळख ही रत्नांची खाण अशी असून ती आपल्याला अशा विज्ञान प्रदर्शनातून कायम ठेवायची आहे.जगातील अनेक शास्त्रज्ञ हे आपल्या स्वबुद्धीवर व कर्तुत्वाने वेगवेगळी संशोधने करून आपली क्षमता सिद्ध करून दाखवलेली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी अशा प्रदर्शनातूनच आपल्या संशोधक बुद्धीला चालना देऊन एक नवा इतिहास घडविला पाहिजे असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी बोलताना व्यक्त केले.
माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा परिषद रत्नागिरी आणि माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नाणीज यांच्या संयुक्त विद्यमाने ५२वे रत्नागिरी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आजपासून नाणीज येथे सुरू झाले आहे. शाश्वत भविष्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान ही या प्रदर्शनाची थीम आहे.
भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुलकलाम विज्ञान नगरीत प्रदर्शनासाठी माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्ण सावंत, नाणीज शिक्षणोतेजक मंडळाचे अध्यक्ष प्रशांत कदम, शिक्षणाधिकारी योजना किरण लोहार, तालुका गटशिक्षण अधिकारी प्रेरणा शिंदे, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक गोपाळ चौधरी, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एम. कासार, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक नरेंद्र गावंड, शिक्षण विस्तार अधिकारी संदेश कडव, जिल्हा विज्ञान मंडळ अध्यक्ष सुदेश कदम, जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष आयुब मुल्ला, प्रकल्प अधिकारी श्री. कांबळे, नाणीज हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रूपाली सावंतदेसाई, नाणीज शिक्षणोतेजक मंडळाचे उपाध्यक्ष राजेश कोळवणकर, सचिव सुधीर कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र दरडी उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शनाचे कार्यक्रमाध्यक्ष प्रशांत कदम यांनी बोलताना सांगितले की, आमची नाणीज शिक्षण उद्योजक संस्था ही कायमच नवीन नवीन संधी शोधत असते त्यातूनच कोकणातील पहिले इस्त्रो चे केंद्र हे काही महिन्यांपूर्वीच आमच्या या हायस्कूलमध्ये सुरू झाले आहे. त्याचा जवळपास चौदाशे विद्यार्थ्यांना लाभ होत आहे त्याचप्रमाणे लवकरच आम्ही पाच किलोमीटर पर्यंतच्या उड्डाण क्षमतेचे रॉकेट लॉन्चिंग साठी परवानगी घेऊन तो प्रकल्पही सुरू करणार आहोत. त्याचप्रमाणे आमच्या प्रशालेत स्वतंत्र सायन्स पार्क व ऑडिटोरियम सुरू झाले आहे.
त्याचप्रमाणे लवकर सॅटेलाईट प्रयोगशाळा ही सुरू होऊन त्यासाठी इस्त्रोकडून दर दोन महिन्यांनी एक तज्ञ शास्त्रज्ञ येऊन मार्गदर्शन करणार आहेत तसेच मी या शाळेचाच माजी विद्यार्थी असल्याने माझे जबाबदारी म्हणून मी शाळेला शिक्षण क्षेत्रात सर्वाधिक उंचीवर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करेन सांगितले.
कोकण बोर्ड हे राज्यामध्ये शिक्षण क्षेत्रात अव्वल असून ती परंपरा आपल्याला सर्वच शैक्षणिक क्षेत्रात कायम ठेवायचे आहे त्यासाठी विज्ञान शिक्षकांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून विज्ञान वैज्ञानिक जनजागृती केली पाहिजे त्याच सोबत नाणीज हायस्कूल ने अत्यंत कमी वेळात नेटके या प्रदर्शनाचे नेटके नियोजन केल्याने शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी हायस्कूलचे अभिनंदन केले. हे प्रदर्शन दोन दिवस सुरू राहणार आहे.