
गावखडी सुरुबनात मद्य प्राशन करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावरती सुरू बनात मद्य प्राशन करणाऱ्या तिघांविरुद्ध पुर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीद नासिर दर्वेश (२४), अब्दुल बाशीत भट्टीवाले (२३, गावखडी मुस्लिम मोहल्ला, रत्नागिरी) फहद कामलुद्दीन दर्वेश (२६, रा. गावखडी, मुस्लीम मोहल्ला, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना ३१ डिसेंबरला रात्री नऊ ते रात्री अकराच्या सुमारास निदर्शनास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक ठिकाणी समुद्रकिनारी सुरु बनात मद्य प्राशन करत होते. या प्रकरणी पोलिस नाईक संदिप महाडीक, पोलिस हवालदार प्रशांत पाटील आणि पोलिस हेड कॉन्स्टेबल महेश कुबडे यांनी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी मद्यपी संशयित तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.