
मसाला व्यापाराच्या व्यवहारातून डोक्यात घातला लोखंडी रॉड
रत्नागिरी ः मसाल्याच्या व्यापारा संबंधीत देवाण-घेवाणीवरुन मोठ्याने बोलण्याचा रागातून लोखंडी रॉडने डोक्यात मारुन दुखापत करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल बूटीयॉ असे संशयिताचे नाव आहे. (पुर्ण पत्ता माहित नाही) ही घटना ३१ डिसेंबरला रात्री आठच्या सुमारास राजिवडा पुलाखाली झोपडपट्टी येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी विजय शंकर गवळी (वय ३९, रा. राजिवडा, पुलाखाली झोपडपट्टी, रत्नागिरी) हे त्याचे मित्र रवी यांच्याशी मसाल्याच्या व्यापारासंबंधी देवाण-घेवाण करण्यातबाबत मोठ्या आवाजात बोलत होते. त्यावेळी मोठ्याने कशाला बोलतोस आवाज कमी कर असे संशयितांने सांगितले. त्यावर आम्ही कामानिमित्त बोलतोय असे सांगितले याचा राग मनात धरुन संशयित राहुल बुटीयॉ याने जवळच पडलेला लोखडी रॉड फिर्यादी गवळी यांच्या डोक्यात मारुन दुखापत केली. या प्रकरणी गवळी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.