
द बॅनियन संस्थेतील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः जिल्हा प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार करुन शांतिनगर नाचणे येथील द बॅनियन संस्थे दाखल असलेल्या रुग्णाला अशक्तपणामुळे उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. जयवंत ठक्कर (वय ६०, रा. द बॅनियन ऑर्गनायझेशन संस्था शांतीनगर, रत्नागिरी. मुळ ः गुजरात ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २२) मध्यरात्रीच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत हा रात्री झोपलेला असताना संस्थेतील काळजीवाह यांनी त्यांची हालचाल होत नसल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.