
रेल्वे प्रवाशाची लॅपटॉप असलेली बॅंग लंपास
रत्नागिरी: कोकण रेल्वेच्या एलटीटी मडगाव एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाची ३० हजार रुपयांचा लॅपटॉप असलेली बॅंग चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. १५) सकाळी साडेसातच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशन दरम्यान घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हेमंतकुमार भास्कर सदगुणे (४७, रा. संकुल सीएचएस सेक्टर, कामोटे, नवी मुंबई) हे एलटीटी मडगाव एक्स्प्रेसने प्रवास करत असताना चोरट्याने ३० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप असलेली बॅग पळवून नेली. या प्रकरणी सदगुणे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.