
गोळप-धोपटवाडी येथील विष प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू
रत्नागिरी ः तालुक्यातील गोळप धोपडवाडी येथील महिलेने अज्ञात कारणातून विषारी द्रव्य प्राशन केले. अधिक उपचारासाठी तिला कोल्हापूर येथे दाखल केले होते. उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विद्या विजय आग्रे (वय. ४२, रा. धोपटवाडी-गोळप, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता.१२) सकाळी पावणे आठच्या सुमारास घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी विद्या आग्रे हिने कोणत्यातरी अज्ञात करणातून विषारी द्रव्य प्राशन केले. तिला अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल केले असता उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला.