
जागतिक कराटे स्पर्धेत रत्नागिरीतील एम.एम.ए. फिटनेस सेंटरचे विद्यार्थी चमकले
रत्नागिरी : गोव्यातील म्हापसा येथील पेडेम स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे आयोजित एफ.एस.के.ए. (फुनाकोशी शोतोकाव कराटे ऑर्गनायझेशन) मार्फत २४व्या वर्ल्ड कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत रत्नागिरीतील एम.एम.ए. फिटनेस सेंटरचे विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.
या स्पर्धेत भारतासह अमेरिका, जपान, इटली, कॅनडा आदि २३ देशांच्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत रत्नागिरीतील एम.एम.ए. फिटनेस सेंटरचे विद्याथ्यांनी चमकदार कामगिरी करुन रत्नागिरीचे नाव जागतिक पातळीवर पोहोचविले. यामध्ये मुलींच्या गटामध्ये सिमराह मजगांवकर (६-७ वर्षे वयोगट)- काता प्रकारामध्ये रौप्यपदक, जोया बुड्ये (१०-११ वर्षे वयोगट) काता व कुमिते यामध्ये कांस्य पदक, फातिमा बुडये (१२-१३ वर्षे वयोगट) कातामध्ये सुवर्ण पदक, फरहीन वाडकर- कातामध्ये कांस्य पदक, आयशा मस्तान कातामध्ये रौप्य पदक पटकावले.
मुलांच्या गटामध्ये उझेर सारंग (१०-११ वर्षे वयोगट) कातामध्ये रौप्य पदक, जैद बुड्ये (१३-१४ वर्षे वयोगट) कातामध्ये रौप्य व कुमितेमध्ये कास्य पदक पटकावले. या सर्व विद्याथ्यांना प्रशिक्षक नौशिन मिरकर व प्रशिक्षक अयान मिरकर यांनी मार्गदर्शन केले. तर एम.एम.ए. फिटनेस सेंटरचे संस्थापक व प्रमुख प्रशिक्षक जावेद मिरकर व पालकांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.