
प्रा .सुनील मारुती भोईर ” बेस्ट टीचर ऑफ द इयर ” पुरस्काराने सन्मानित
रत्नागिरी : येथील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा .सुनील मारुती भोईर यांना दिल्ली विधानसभा दिल्ली येथे “भारत विभूषण “या पुरस्कार सोहळ्यात ” बेस्ट टीचर ऑफ द इयर “या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हा पुरस्कार सोहळा २२ नोव्हेंबर २०२४ रोजी दिल्ली या ठिकाणी दिल्ली विधानसभा मध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिल्ली विधानसभा अध्यक्ष राम निवास गोयल, यांच्या हस्ते “बेस्ट टीचर ऑफ द इयर” हा पुरस्कार देण्यात आला.
प्रा. सुनील भोईर यांनी आतापर्यंत विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिले आहे. तसेच त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत शिखर साहित्य अकादमी छत्तीसगड रायपूर येथे प्रा. भोईर यांना “भारत भूषण” पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
“भारत विभूषण”, या कार्यक्रमांमध्ये देशभरातील विविध राज्यांमधून आलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील १०० लोकांना विशेष कार्य केल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला. दिल्ली येथे “दिल्ली विधानसभा”, सभागृहामध्ये सामाजिक सुधारणा आणि उच्च शिक्षण संस्थाचे अध्यक्ष
डॉ. अतुल कुमार शर्मा, दिल्ली विधानसभा
निमंत्रक श्री पवन शर्मा आदि विविध मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम सोहळा पार पाडला.
सन्मान चिन्ह, मानपत्र, आणि मानकरी बॅच असे पुरस्काराचे स्वरूप होते.
या आधी प्राध्यापक भोईर यांना गरुड फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे आणि बहुउद्देशीय संस्था पुणे या संस्थांद्वारे राज्यस्तरीय आदर्श “शिक्षक रत्न पुरस्कार” प्राप्त झाला आहे. रायपूर येथे “भारतभूषण”, पुरस्कार मिळाला असून त्यांना आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावरचे तीन पुरस्कार आणि राज्यस्तरावर दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
दरम्यान प्रा.सुनील भोईर यांना प्राप्त झालेल्या या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.