
बांग्लादेशी घुसखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम
रत्नागिरी: चिपळूण, रत्नागिरीतील नाखरे येथे विनापरवाना भारतात घुसलेल्या बांग्लादेशी नागरिकांवर कारवाई केल्यानंतर आता जिल्ह्यातील प्रत्येक भागात बांग्लादेशी घुसखोरांचा शोध घेतला जाणार आहे. त्यासाठी विशेष पथकाद्वारे विशेष मोहीम हाती घेतली जाणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात घुसलेल्या बांग्लादेशींवर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर पोलिसांच्या खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून रत्नागिरी तालुक्यातील नाखरे येथे एका आंबा व्यापाऱ्याकडे बांग्लादेशी घुसखोर कामाला असल्याचे पुढे आले होते.त्यानंतर मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकून बांग्लादेशी घुसखोरांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर कारवाई करत त्यांची पोलीस कोठडीत व त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अन्य भागातही बांग्लादेशी घुसखोर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा बांग्लादेशी घुसखोरमुक्त करण्यासाठी जिल्हा पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना करण्याची तयारी केली आहे. या पथकाद्वारे संशयास्पद भागात सर्च ऑपरेशन राबविण्यात येणार आहे. या भागात यापूवच बांग्लादेशींचे वास्तव्य होते त्या भागावर अधिक लक्ष केेंद्रीत केले जाणार आहे. ज्या नागरिकांना बांग्लादेशी घुसखोरांसंदर्भात माहिती आहे त्यांनी ती जिल्हा पोलिसांना द्यावी असे आवाहन पोलीस अधिक्षक धनंजय कुलकण यांनी केले आहे.