
दाभोळ – हर्णै समुद्रात एलईडी मासेमारी करणाऱ्या दोन नौकाना घेतले ताब्यात
दापोली : दाभोळ- हर्णै येथील समुद्रात 20 वाव पाण्यात बेकायदेशीर एलईडी मासेमारी करणाऱ्या दोन नौकाना मत्स्य विभागाने ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्त असे की, 27 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास दाभोळ- हर्णै येथील समुद्रात सुमारे 20 वाव पाण्यात रायगड व रत्नागिरीतील एकूण दोन नौका राजश्री (IND-MH-4-MM- 3795) व भाविका ( IND-MH-3-MM-3418 L.E.D ) साहित्य वापरून मासेमारी करत असल्याचे निदर्शनास आले. या अनधिकृत मासेमारीनंतर मा.सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष संयुक्त गस्त नियोजित करून सदर गस्ती दरम्यान चिन्मय जोशी परवाना अधिकारी रत्नागिरी, पार्थ तावडे परवाना अधिकारी साखरी नाटे, स्वप्निल चव्हाण परवाना अधिकारी गुहागर व सुरक्षा रक्षक उपस्थितीत होते.
दोन्ही नौके विरुद्ध 28.11.2024 रोजी प्रतिवेदन दाखल करण्यात आले असून नौकेतील जनरेटर व L.E.D साहित्य जप्त करण्यात आले आहे व दोन्ही नौका जयगड बंदरात ठेवण्यात आल्या आहेत.