
विद्यार्थ्यांच्या ‘अपार कार्ड’साठी ३० नोव्हेंबरची डेडलाईन
रत्नागिरी : आता आधार कार्डप्रमाणेच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 12 अंकी ‘अपार कार्ड’ बनवले जाणार आहेत. यामध्ये त्यांच्या शैक्षणिक तपशील आणि इतर नोंदी केल्या जातील. हे ‘वन नेशन, वन स्टुडंट आयडी’ म्हणून वापरले जाऊ शकते. हे कार्ड प्राथमिक ते माध्यमिक शाळेत शिकणार्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बनवले जाणार आहे. सध्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेण्यास सुरुवात झाली असून, शनिवारी, 30 नोव्हेंबर शेवटची तारीख असणार आहे.
केंद्र सरकारने 30 नोव्हेंबरपर्यंत हे कार्ड तयार करण्याच्या सूचना दिल्या. दिवाळी सुट्या त्यात निवडणुका यामुळे या कामाला अडथळा निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील काही दिवसात शंभर टक्के ‘अपार कार्ड’ करण्याचे मोठे आव्हान असणार आहे ‘अपार कार्ड’ ही एक अशी प्रणाली आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना 12 अंकी क्रमांक दिला जाईल. त्याच्या मदतीने भविष्यात त्यांची शैक्षणिक प्रगती आणि यशाचा मागोवा घेता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अधिकाअधिक शैक्षणिक विकास होण्यास मदत होणार आहे. हे कार्ड प्राथमिक ते माध्यमिक शाळेत शिकणार्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बनवले जाईल. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तपशील आणि इतर नोंदी केल्या जातील. सध्या जिल्ह्यातील माध्यमिक तसेच प्राथमिक शिक्षक या कामामध्ये गुंतलेले दिसत आहेत.