
भारतरत्न डाॕ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स गॅलरी विकसित करणे हा विकास कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न
रत्नागिरी : ज्येष्ठ शास्त्रज्ञ व मानवतावादी विचारवंत पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर, प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉ.विकास आमटे पालकमंत्री उदय सामंत हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. रत्नागिरी पालिकेच्या भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम सायन्स गॅलरी विकसित करणे विकासकामाचा लोकार्पण सोहळा
मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. माळनाका येथील श्रीमान हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण माळनाका येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच अधिकारी वर्ग व नगरपरिषदेचे कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.