भोस्ते घाटात तिहेरी अपघात, ट्रक 200 फूट दरीत, कारमधील 5 जखमी
रत्नागिरी: जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या भोस्ते घाटात आज सकाळी भीषण तिहेरी अपघात झाला. गोव्यातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने घाटातील वळणावर समोर उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकला जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे मागून येणारा अवजड कंटेनर अनियंत्रित झाला आणि समोरून येणाऱ्या ईर्टिगा कारवर आदळला. या भीषण अपघातात कारमधील सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर रस्त्याच्या बाजूला उभा असलेला मालवाहू ट्रक थेट 200 फूट खोल दरीत कोसळला.
अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
गेल्या सात दिवसांत भोसले घाटातील हा चौथा अपघात आहे. अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.
कारमधील पाचजण जखमी
सिमेंट बलकर देखील खोल दरीत कोसळला. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले आहेत. तर बकलरमधील चालकासह क्लीनर देखील जखमी झाला आहे. असे एकूण सातजण जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकरणी जीवितहानी झाली नाही. तर दोन्ही ट्रक दरीत कोसळल्याने ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कारचे देखील यात नुकसान झाले आहे.

दरम्यान मुंबई- गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील या विचित्र अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक मंदावली आहे. भोस्ते घाट हा अपघातांना कारणीभूत ठरतो आहे. या घाटात वारंवार अपघात होत आहे. त्यामुळे हा घाट धोकादायक बनला आहे. गेल्या चार दिवसातील हा चौथा भीषण अपघात आहे.