आंबेशेत येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सुरेश नथुराम सावंत (वय ७०, रा.बौद्धवाडी-आंबेशेत, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ९) दुपारी दोनच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरेश सावंत यांना उच्च रक्त दाब व किडनीचा आजार होता. शनिवारी त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.