सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः खेडशी-गयाळवाडी येथील रेल्वे ब्रीज शेजारी कच्चा रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. प्रवीण बाबुराव मजगांवकर (वय ३२, रा. मिरजोळे, जांभूळफाटा, रत्नागिरी) असे संशयित मद्यपान करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ७) दुपारी पावणे बाराच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित तरुण सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना सापडला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल रुपेश भिसे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.