
पार्किंगच्या कारणावरून दोघांनी एकास केली बेदम मारहाण
खेड : शहरातील मच्छीमार्केट नजीक पार्किंग केलेल्या कारच्या कारणातून दोघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना बुधवार दुपारी १२.४५ वा चे सुमारास घडली. या प्रकरणी दोघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैस यासीन मणियार, खल्फान यासीन मणियार अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.
या प्रकरणी मुबीन आझाद हमदुले यांनी तक्रार दाखल केली. फिर्यादी हे त्यांच्या भावाच्या मालकीचे इनोव्हा कार क्र एम.एच.१४ डी एन ०८७६ ही घेऊन खेड मच्छीमार्केट येथे पाकींगला लावली. त्यावेळी त्यांच्या मागून हे त्यांच्या ताब्यातून रिक्षा टेम्पो क्र एम एच ०८ डब्ल्यु ४७६७ घेऊन तेथे आले तेव्हा फिर्यादी याने गाडी काढतो थांबा असे सांगितले. तेव्हा कैस मणियार यांने हमदुले यांचेशी वाद घालून त्यांना शिवीगाळ करुन हाताचे थापटाने मारहाण केली.
तर जवळच्या हिंदुस्तान कँटर्स बिर्याणीच्या दुकानातून लोखंडी पाईप आणून फिर्यादीच्या नाकावर व उजव्या हाताच्या कोपरावर मारुन दुखापत केली. त्यावेळी खल्फान मणियार याने तेथे येऊन फिर्यादी यांचे गाडीचा वायपर तोडुन वायपरने फिर्यादी यांचे गाडीचे समोरील काच तोडून नुकसान तसेच गाडीवर लाथा व वायपरने मारुन नुकसान केले. फिर्यादी यांचे जिवीतास धोका होईल अशा रितीने टेम्पो फिर्यादी यांचे दिशेने रिव्हर्स घेतला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.