
चिपळूणातील ३९७ शाळांना ६७ हजार मोफत पुस्तकांचे वाटप
चिपळूण : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि खाजगी अनुदानित शाळा यांचे सन २०२४ – २५ हे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार आहे.हे शैक्षणिक वर्ष सुरू होताना शासनाच्या उपक्रमांप्रमाणे विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवली जातात. यावर्षी ही शाळा मोफत पाठ्य पुस्तके वाटप सुरू आहे. चिपळूण तालुक्यातील ३९७ जिल्हा परिषद शाळांना यावर्षी ६७ हजार ३७२ पुस्तके प्राप्त झाल्या असून त्यांचे वाटप सध्या केंद्रस्तरावरून शाळांच्या शिक्षकांच्या ताब्यात देण्याचे काम सुरू असल्याची माहिती पं. स. शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी श्री इरनाक दिली.
शासनाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवली जातात आणि ही प्रस्ताव पाठ्यपुस्तके शाळा सुरू होण्याच्या आधी शाळेमध्ये पोहच केली जातात. जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांना या मोफत पाठ्यपुस्तकांचा फायदा व्हावा. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, याची तरतूद राज्यघटनेमधील मूलभूत अधिकारा मद्ये केली आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना शासन स्तरावरून काही शालेय सुविधा पुरवल्या जातात .
चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या ३३० शाळा आणि खाजगी अनुदानित ६७ शाळा आहेत. या शाळांना या वर्षी ६७ हजार ३७२ पुस्तके प्राप्त झाली आहेत. ही पुस्तके प्रथम केंद्रप्रमुखांच्या ताब्यात देण्यात आली आहेत आणि त्यानंतर केंद्रानुसार त्या प्रत्येक शाळेत पाठ्यपुस्तके दिली जात आहेत. मात्र, शाळा सुरू झाल्यावर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहेत. खाजगी अनुदानित शाळांमध्ये सेमी आणि उर्दू माध्यमच्या सुद्धा शाळा समाविष्ट आहेत. तालुक्यांमध्ये एकूण ३९७ शाळांमध्ये १७ हजार २७६ विद्यार्थी असून या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा फायदा होत आहे.
पाठ्य पुस्तके वाटप करण्याचे काम सर्व शाळांमध्ये सुरू असून जेव्हा १५ जून रोजी शाळा सुरू होतील त्याच दिवशी ही पुस्तके विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत.