
रत्नागिरीत क्रिकेट प्रेमी साठी फॅनपार्कचे आयोजन
रत्नागिरी : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशतर्फे आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीगचा थरार आता प्रत्यक्ष अनुभवण्याचा आनंद मिळणार आहे. फॅनपार्कच्या माध्यमातून यातील पहिलाच सामना रत्नागिरी जेट्स विरुद्ध कोल्हापूरी टस्कर्स असा होणार आहे. तो ३० फुट बाय १५ फुटच्या एलईडी वॉलवर पहाता येणार आहे, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी बिपिन बंदरकर यांनी दिली.
येथील हॉटेल विवेक येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, पुण्यामध्ये हे सर्व सामने होणार आहेत. रत्नागिरीच्या संघाला रत्नागिरीकरांनी चांगले प्रोत्साहन द्यावे तसेच एमपीएलचा प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव घेत आनंद लुटावा यासाठी या फॅनपार्कचे आयोजन केले आहे. एमपीएलचा हा थरार अनुभवायची संधी
२ जुनला संध्याकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत घेता येणार आहे. शहरातील उद्यमनगर येथील एम .डी नाईक हॉल
पटवर्धन वाडी येथे याचे आयोजन केले आहे. रत्नागिरी
फ्री पासेससाठी संपर्क
9921003394
बलराम कोतवडेकर
यांच्याशी. यावेळी करमणुक फनिगेम्स, लकी ड्रॉचे आयोजन केले आहे. सुट्टीचा हंगाम असल्याने मुलांसह रत्नागिरीकर, क्रिकेट प्रेमींनी जास्तीत जास्त याचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री. बंदरकर यांनी केले.