
नाणीज येथे दारु विक्रीवर पोलिसांची धाड
रत्नागिरी ः तालुक्यातील नाणीज तळवाडी ते घडशीवाडी येथील जंगलमय भागात विनापरवाना हातभट्टीची दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ५१० रुपयांची पाच लिटर दारु पोलिसांनी जप्त केली. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. २२) मे सकाळी पावणे अकराच्या सुमारास नाणीज तळवाडी ते घडशीवाडी येथील जंगलमय भागात निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार घडशीवाडी येथील जंगलमय भागात दारु विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ५१० रुपयांची पाच लिटर दारु जप्त केली. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल अजय कांबळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.