
धनादेश अनादर प्रकरणी दंडासह एक महिना साध्या कैदेची शिक्षा
खेड : संदीप प्रकाश साळुंखे यांनी मुरली मनोहर शाखा खेड या पतसंस्थेला रू. ४१,०००/- चा धनादेश कर्ज फेडण्यासाठी दिला होता, मात्र त्याचा अनादर झाला. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला एक महिना साध्या कैदेची शिक्षा तर ६०००० रुपये दंड देखील ठोठावला दंड न दिल्यास देखील अधिक शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
धनादेशाचा अनादर केला म्हणून मुरली मनोहर नागरी पतसंस्थामार्फत खेड येथील दिवाणी न्यायाधीश यांच्याकडे फिर्याद, एडवोकेट समीर शरद शेठ, अडवोकेट सुधीर शरद बुटाला, एडवोकेट देवरुखकर मॅडम यांच्यामार्फत दाखल करण्यात आली होती, सदर फिर्याद कामी फिर्यादी श्री. मयूर गांधी यांचा सर तपास देखील झाला होता. एकंदर पुरावा सादर करण्यात आला. फिर्यादीचा पुरावा लक्षात घेऊन व युक्तिवाद लक्षात घेऊन माननीय न्यायाधीश महोदय यांनी आरोपीला एक महिना साध्या कैदेची शिक्षा तर ६०००० रुपये दंड देखील ठोठावला दंड न दिल्यास देखील अधिक शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या निकालामुळे न वटणारे धनादेश देणाऱ्या व्यक्तींवर दहशत बसेल असे आशा बाळगली जात आहे.