
दुचाकींच्या धडकेत वृद्ध जागीच ठार
चिपळूण – गुहागर मार्गावर उमरोली पेट्रोल पंपानजीक दोन मोटारसायकलींमध्ये अपघात होऊन ७५ वर्षीय दत्ताराम बेंडू पडवेकर ( रा. कात्रोळी ) यांचा अपघाती मृत्यू झाला. या प्रकरणी चिपळूण येथील गजानन सुभाष बोंडकर ( रा. पाग नाका ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २७ मे रोजी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास उमरोली येथे घडली. संतोष पडवेकर यांचे वडील दत्ताराम पडवेकर हे मोटारसायकलने पेट्रोल पंपाकडे जात असताना, समोरून येणाऱ्या बोंडकर यांच्या टीव्हीएस मोटारसायकलची जोरदार धडक त्यांच्या दुचाकीला बसली. त्यांनी विरुद्ध दिशेला येऊन ही ठोकर दिली. यामध्ये दत्ताराम पडवेकर यांचा मृत्यू झाला. अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.