
गणपतीपुळे येथे पर्यटकांची तोबा गर्दी
रत्नागिरी= गणपतीपुळे येथे पर्यटकांची तोबा गर्दी आहे त्यासाठी सागरी पोलीस ठाणे जयगड व गणपतीपुळेपोलीस स्टेशन यांच्याकडून चौक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई मधले असलेली लोकसभेची निवडणूक इतर ठिकाणच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंत शनिवार रविवार सुट्टी आल्याने व रविवारी संकष्टी चतुर्थी असल्याने गणपतीपुळे परिसर अक्षरशः गर्दीने फुलून गेला आहे त्यासाठी जयगड पोलीस स्टेशनचे एपीआय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे. गणपतीपुळे रत्नागिरी, गणपतीपुळे सागरी मार्ग, गणपतीपुळे जयगड खंडाळा या प्रत्येक नाक्यावर चौक पोलीस बंदोब ठेवण्यात आलेला आहे तसेच सागरी रक्षक यांना सुद्धा मार्गदर्शन केलेले आहे पर्यटकांनी पाण्यात पोहण्यासाठी जाऊ नये, गाड्यांचा पार्किंग व्यवस्थित ठेवण्यासाठी यासाठी वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत गणपतीपुळे पासून जवळ जवळ दोन किलोमीटरच्या गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत स्वतः एपीआय कुलदीप पाटील व त्यांचे सहकारी जातीनिशी लक्ष घालून आहेत.
