
रेल्वेच्या स्टॉफ पार्किंगमधून दुचाकी पळविली.
रत्नागिरी ः कोकण रेल्वेच्या स्टाफ आवारात पार्क केलेली दुचाकी चोरट्याने पळविली. ८० हजार दुचाकीची किमंत आहे. शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १४ ते मंगळवारी (ता. २१) मे या कालावधीत कोकण रेल्वे स्टेशन आवारात असलेल्या रेल्वे स्टाफ वाहन पार्किंग शेडमध्ये घडली. पोलिसांकडून फिर्यादी यांनी रेल्वे स्टाफ वाहन पार्किंग मध्ये शेडच्या समोर पाक् करुन ठेवली होती. चोरट्याने ती पळविली. या प्रकरणी फिर्यांदी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.