
रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघातर्फे कोकण विभागीय वधुवर सूचक मेळावा
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघातर्फे कोकण विभागीय भंडारी समाज वधुवर सूचक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दिनांक २५ मे 2024 रोजी हा मेळावा होणार असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, रायगड येथील वधुवर यावेळी सहभागी होणार आहेत.
गगनगिरी कृपा मंगल कार्यालय, रहाटाघर बस स्टँडच्या पुढे , ८० फुटी हायवे, मांडवी, रत्नागिरी येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ यावेळेत हा मेळावा होणार असून यामध्ये इच्छुक नोंदणीकृत, नवीन नोंदणी वधुवर व घटस्फोटीत वधुवर यांनी व्यक्तीश: व पालकांसहीत उपस्थित रहावयाचे आहे. उपवर मुला मुलींनी आपला रंगीत फोटो, जन्मपत्रिका झेरॉक्स आणि बायोडेटा सोबत घेऊन यावे. नवीन नोंदणी करणार्यांना रु. ३०० शुल्क राहील. यापूर्वी नोंदणी केलेल्या मुला – मुलींनाही या मेळाव्यात सहभागी होता येईल. दुपारी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ वेळोवेळी वधुवर मेळावे घेऊन ज्ञातीतील मुलामुलींचे विवाह जुळवण्याचे कार्य करीत आहे. या मेळाव्याला इच्छुक वधुवर व पालकांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन करण्याचे आयोजकांनी आवाहन केले आहे.