
नाणीज येथे गावठी दारु विक्रीवर पोलिसांची धाड
रत्नागिरी ः तालुक्यातील नाणीज येथील घडशीवाडीच्या जंगलमय भागात पोलिसांनी विनापरवाना हातभट्टीच्या दारु विक्रीवर कारवाई केली. या कारवाईत हातभट्टीची ७ लिटर दारु जप्त केली. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास दिलीप गुरव असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता.२२) सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडशवाडीच्या जंगलमय भागात निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित नाणीज-घडशीवाडी येथील जंगलमय भागात हातभट्टीच्या दारुची विक्री करत असताना निदर्शनास आली. पोलिसांनी संशयिताकडून ४०३ रुपयांची सात लिटर दारु जप्त केली. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार संतोष कांबळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.