
चिपळुणात पर्यटकाचा आकस्मित मृत्यू
चिपळूण : मित्रासोबत आलेल्या पर्यटकांचा चिपळुणात मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. पाडुरंग गोविंद लोकुळकर (४९, खानापूर-सांगली) असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार पांडुरंग लोकुळकर हे त्यांच्या मित्रासोबत दापोली समुद्र किनारी फिरण्यास आले होते. ते दापोली ते विटा-सांगली असे गाडीने जात असताना शहरातील मार्कंडी येथील अभिषेक हॉटेल येथे जेवणाकरिता थांबले होते. यावेळी लोकुळकर हे कोणतीही हालचाल करत नसल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्यांना पुढील उपचारसाठी कामथे रुग्णालयात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकायांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.