
मत्स्य अभियांत्रिकी पदविका विद्यालयाला उत्कृष्ट तंत्र विद्यालय पुरस्कार
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीचा 52 वा वर्धापनदिन शनिवार, दिनांक 18 मे, 2024 रोजी दापोली येथे उत्साहात संपन्न झाला. त्यानिमित्त विद्यापीठांतर्गत उत्कृष्ट तंत्र विद्यालय म्हणून मत्स्य अभियांत्रिकी पदविका विद्यालय, रत्नागिरी यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि पाच लाखांचा धनादेष देवून गौरविण्यात आले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे मा. कुलगुरू महोदय डॉ. संजय भावे यांच्या हस्ते सदर पुरस्कार मत्स्य अभियांत्रिकी पदविका विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष मोहिते यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी विद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव, श्री. रोहित बुरटे व इतर कर्मचारी उपस्थित होते.