
श्रेयस एंटरमिजियटला वादळी पावसाचा दणका
३२ मीटर उंचीची चिमणी कोसळली, १ कोटीची हानी
खेड:- खेड लोटे औद्योगिक वसाहतीत श्रेयस एंटरमिजियट रासायनिक कंपनीला वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे. कंपनीतील ३२ मीटर उंचीची चिमणी व पत्रे उडून १ कोटीहून अधिक रूपयांची हानी झाली आहे. सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
वादळी पावसाचा लोटे औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनाही फटका बसला आहे. श्रेयस एंटरमिजियटच्या प्लान्ट नंबर डी २१ ते २४ या रासायनिक कंपनीतील ३२ मीटर उंचीची थर्मिक फ्लुईड चिमणी कारखान्याच्या आवारातील इतर तीन इमारतींवर कोसळली. या दरम्यान, कोणत्याही कामगाराला दुखापत झालेली नाही. मात्र कारखान्यातील इमारतींचे पत्रे अन्यत्र उडून गेले. ३ इमारतींसह चिमणी मिळून १ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचे कंपनीचे मुख्य व्यवस्थापक अनंत महाडिक यांनी सांगितले. या घटनेबाबत संबंधित यंत्रणांना कळवण्यात सांगण्यात आले.