
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशाची सोन्याची चेन चोरट्याने लांबवली
रत्नागिरी:-कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची सोन्याची चेन चोरट्याने लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना 14 मे 2024 रोजी रात्रीच्या सुमारास घडली या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे 14 मे रोजी कोकण रेल्वे मार्गावरील कोचीवली-एलटीटी गाडीने पवास करत होते रात्री 2च्या सुमारास गाडी रत्नागिरी रेल्वेस्टेशननजीक आली असता तकारदार यांनी झोप लागली. यावेळी चोरट्याने तकारदार यांच्या गळ्वयातील 25 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लांबवली, अशी तकार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली.