
दुचाकीला धडक देणाऱ्या कारचालकाविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहरातील टीआरपी येथे बेदरकारपणे कार चालवून दुचाकीला पाठीमागून धडक देत अपघात केला. याप्रकरणी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना दि. ३० मार्च २०२४ दुपारी १ वा. सुमारास घडली होती.
शिवप्रसाद महादेव कोरे (रा. रवींद्रनगर, कुवारबाव, रत्नागिरी) असे या प्रकरणी संशयित कार चालकाचे नाव आहे. संशयित कार चालक शिवप्रसाद कोरे आपल्या ताब्यातील कार (एम. एच-०८-बीसी-३४३८) ही निष्काळजीपणे चालवून टीआरपी येथे दुचाकी (एमएच-०८-बीबी ५६६८) यावरील चालक बनवारी जयलाल मिना यांच्या ताब्यातील दुचाकीला पाठीमागून ठोकर देऊन अपघात केला. या अपघातात बनवारी मिना यांना दुखापत झाली. याप्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष गायकवाड यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी बुधवार, १५ मे रोजी शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.