
शृंगारतळीत एकाच दिवशी ४ दारुअड्ड्यांवर धाड
गुहागर : गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळीत एकाच दिवशी ४ दारुअड्ड्यांवर धाडी घालण्यात आल्या. यामध्ये सापडलेला मुद्देमाल जप्त करुन संबंधितांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी दिली.
निवडणुकीनंतर उत्पादन शुल्क विभागाचे नवे निरीक्षक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने धडक मोहिम हाती घेऊन दारुअड्ड्यांवरील कारवाई सुरु केली आहे. शृंगारतळीत चार ठिकाणी धाड टाकून ही कारवाई केल्याने संपूर्ण गुहागर तालुक्यात इतर बेकायदा धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी ही कारवाई मोहीम अशीच सुरु राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.