
देवरूख-वांझोळेत झाडावरून पडून प्रौढ जखमी
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे-देवरुख आंब्याच्या झाडावरून खाली पडून प्रौढ जखमी झाला. ही घटना गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. कृष्णा गंगाराम नटे (५०, रा. वांझोळे-देवरुख, ता. संगमेश्वर) असे जखमी प्रौढाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल करण्यात आले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा नटे हे सकाळी आपल्या शेतजमिनीत असलेल्या आंब्याच्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी गेले होते. झाडावर चढलेले असताना अचानक त्यांना चक्कर आली आणि ते पडले. त्यांच्या उजव्या पायाला मुका मार लागला. जखमी अवस्थेत त्यांना देवरुख येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.