
भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. चंद्रशेखर गजानन निमकर यांची नियुक्ती.
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांनी नुकतेच डॉ चंद्रशेखर गजानन निमकर यांचे भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
डॉ चंद्रशेखर निमकर हे विविध क्षेत्रांमध्ये काम करत असून. पर्यावरण, शैक्षणिक, आरोग्य विषयक, सामाजिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. विविध क्षेत्रातील लोकांपर्यंत पोहोचून सरकारचे काम विविध योजना यांची माहिती देत लोकांना लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निमकर यांनी म्हटले आहे. डॉ. निमकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.