
चिपळुणात रेल्वे प्रवाशाच्या लॅपटॉपसह रोख रक्कम लंपास
चिपळूण : कुर्ला मडगाव एक्सप्रेसमधून सावंतवाडी ते पनवेल असा प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या लॅपटॉपसह रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना सोमवारी कणकवली ते चिपळूण प्रवासादरम्यान घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद प्रवास प्रल्हाद कानसे (२८, कांजूरमार्ग) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानसे हे ट्रेनने कुर्ला मडगाव एक्सप्रेसमधून सावंतवाडी ते पनवेल असा प्रवास होते. कणकवली ते चिपळूण रेल्वेस्थानक प्रवासादरम्यान त्यांची ९०० किंमतीची काळ्या रंगाची बॅग, ५० हजार किंमतीचा लॅपटॉप, रोख रक्कम १५०० रुपये असा ६०,५०० रुपये किंमतीचा ऐवज तसेच आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, डेबिट कार्ड चोरुन नेले. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला.