
वाहन विक्री घोटाळ्यातील संशयिताचा जामिन
खेड : हुंदाई केट्रा वाहनांची विक्री केली मात्र त्या वाहनाचा ताबा दिला नाही या आरोपावरुन संशयित हुसैन हनिफ परकार यांनी संबधिताला दिला नाही , गेले वर्षभर तक्रारदार यांनी वाहन मिळण्याकरीता संशयिताकडे वारंवार संपर्क केला, परंतु त्यांनी वाहनही दिले नाही व घेतलेली रक्कमही परत केली नाही, अशा प्रकारची तक्रार खेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारनुसार संबंधीत संशयितांच्या विरूध्द भा.दं.वि. कलम-420, 406 नुसार तक्रार दाखल करण्यात आली. या गुन्हा मधील संशयित याचा जामीन अर्ज मे. प्रथम वर्ग न्यायालय, खेड यांनी फेटाळला होता, संशयिताच्यावतीने खेड येथील मे. जिल्हा व सत्र न्यायालय येथे जामीन अर्ज दाखल करण्यात आला. संशयिताच्यावतीने अॅड. स्वरूप सुबोध थरवळ यांनी जामीन अर्जवर युक्तीवाद केला, अॅड. थरवळ यांचा युक्तीवाद व उच्च न्यायालयाचे निकाल ग्राहय धरून संशयिताचा काही अटी व शर्तीवर अंतरीम अटकपूर्व जामीन अर्ज हा मंजुर केलेला आहे.