
टिळक स्मारक भगिनी मंडळाच्या अध्यक्षपदी राधिका वैद्य
रत्नागिरी :स्त्रीयांचे टिळक स्मारक या संस्थेच्या भगिनी मंडळाची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. राधिका श्रीरंग वैद्य यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष सौ. अर्चना जोगळेकर व सौ. वैशाली जोशी, सचिव सौ. सुखदा गोखले आणि सौ. विद्या गोरे तसेच खजिनदारपदी सौ. सुखिता भावे आणि सौ. अपूर्वा पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाली. या मंडळाला १०० वर्षांची परंपरा लाभली आहे. भगिनी मंडळातर्फे वर्षभर विविध कार्यक्रम, उपक्रम राबवले जातात. यात टिळक जयंती, चातुर्मास, नवरात्र, स्नेहसंमेलन अशा कार्यक्रमांचे नियोजन केले जाते. यापुढेही विविध कार्यक्रम आयोजित करू, असे अध्यक्ष सौ. राधिका वैद्य यांनी सांगितले.