
दिवाणखवटी रेल्वेस्थानकातून महिलेचे मंगळसूत्र लंपास
खेड : कोकण रेल्वे मार्गावरील मंगळूर एक्सप्रेसमधून मुंबई ते कणकवली असा प्रवास करणाऱ्या एका महिलेचे ५५ हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र चोरट्याने लंपास केल्याची घटना दिवाणखवटी रेल्वेस्थानकात घडली. येथील पोलीस स्थानकात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला ६ मे रोजी १२१३३ क्रमांकाच्या मंगळूर एक्सप्रेसमधून एस-७ डब्यातील आसन क्रमांक ६५ मधून प्रवास करत होत्या. एक्सप्रेस दिवाणखवटीनजीक क्रॉसिंगसाठी थांबलेली असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाचे ५५ हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र खेचून पलायन केले.