
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका सप्ताह उत्साहात साजरा
रत्नागिरी : परिचारिका सप्ताहाला सुरवात दि.6 मे 2024 पासून झाली. यामध्ये विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन केले होते.
परिचारिका सप्ताहा दरम्यान न्यूट्रीशन दिवसही साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट बनवले व त्यांचे सादरीकरण केले. समतोल आहार, मधुमेहसाठीचा आहार, उच्च रक्तदाबासाठीचा आहार, कमी प्रथिंनाचा आहार असे वेगवेगळे आहार बनवले होते.तसेच विद्यार्थिनींसाठी वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा, टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धा आयोजित केल्या होत्या. मुलींसाठी आंताक्षरी, ट्रेझर हंट, संगीत खुर्ची असे फनी गेम्ससही आयोजित केले होते.

दि. 10मे 2024 रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि आश्रमगीताने झाली. नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या सौ. अर्चना बाईत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी प्रमुख पाहुण्या परकार नर्सिंग महाविद्यालयच्या मुख्यद्यापिका सौ. प्रज्ञा बसणकर यांना आमंत्रित केले होते. त्यांनी विद्यार्थिनींना अवर नर्सेस अवर फ्युचर, द इकॉनॉमिक पॉवर ऑफ केअर या यावर्षीच्या परिचारिका दिनाच्या थीम बद्दल मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थिनींना नर्सिंग क्षेत्रातील संधी व नर्सिंग क्षेत्रात होणारे बदल याबद्दल माहिती दिली.तसेच संस्थेच्या एल एम सी मेंबर सौ. संपदा जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी विध्यार्थिनींना त्यांचे नर्सिंग क्षेत्रातील अनुभव सांगितले आणि मुली त्यांचे काम कसे कुशलतेने करू शकतात याबद्दल माहिती दिली. यावेळी बी सी ए कॉलेज प्राचार्या स्नेहा कोतवडेकर उपस्थित होत्या. तसेच शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सलोनी नाटेकर आणि कु.सिद्धी लिंगायत या नर्सिंगच्या विध्यार्थिनींनी केले व आभार प्रदर्शन नर्सिंग कॉलेजच्या अध्यापिका सौ. गौरी भंडारी-भाटकर यांनी केले.कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने झाली.