
आजारपणाला कंटाळून परचुरी येथील विवाहित युवकाची आत्महत्या
संगमेश्वर:आजारपणाला कंटाळून संगमेश्वर तालुक्यातील परचुरी चंदरकरवाडी येथील विवाहित युवक सुरेंद्र अनंत चंदरकर व 43 वर्ष याने राहत्या घरात लाकडी वाशाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
याबाबत पत्नी सारिका सुरेंद्र चंदरकर यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार सुरेंद्र अनंत चंदरकर हे आजारी असल्याने त्या आजाराने त्रस्त होऊन गेलेले होते. त्यात त्यांना जेवण जात नव्हते तसेच त्यांना बसता ही येत नव्हते. आजारावर उपचार करून देखील बरे होत नसल्याने ते जीवनाला कंटाळून गेले होते.
घरातील पत्नी मतदान देण्यासाठी गेली असता सुरेंद्र याने गळ्यात ओढणीचा फास करून किचन रूम मधील लाकडीवाशाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्यात सदर घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस पंदेरे अधिक तपास करत आहेत.