
तळसरमध्ये दानपेटीची चोरी
चिपळूण : तळसर-गुरववाडी येथील ग्रामदेवतेच्या मंदिरातील दानपेटी चोरीला गेली आहे. शनिवारी (ता. ४) हा प्रकार घडला. या बाबतची फिर्याद सुरेश शिवराम निकम यांनी अलोरे शिरगाव पोलिस ठाण्यात दिली. गुरववाडी येथील ग्रामदेवतेच्या मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. सीसीटीव्हीची हार्ड डिस्क मशिन, दानपेटी आणि एक हजार रुपये चोरीला गेल्याचे निकम यांनी तक्रारीत म्हटले आहे.